Yavatmal : यवतमाळमध्ये हमी भावावरुन शासनाला घेरण्यासाठी ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन
सध्या राज्यात हवामान बदलामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे बळीराजा आधीच संकटात सापडलाय. त्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठं आव्हान आहे. हवामान बदलामुळे शेतमालाला चांगला हमी भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यासमोर मोठं आव्हान आहे. त्याय सरकारकडूनही मदत न मिळाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. यासाठी यवतमाळमध्ये आज ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. कापसाला प्रति क्विंटल १० हजार हमी भाव जाहीर करावा, आणि त्याची खरेदी लवकर सुरु करावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आलीय.तसंच कापसासोबतच सोयाबीनलाही ७ हजारांपर्यंतचा हमी भाव, आणि हरभरा तुरीची नाफेड मार्फत ऑनलाईन खरेदी सुरु करावी, अशी मागणीही ठाकरे गटाकडून करण्यात येतेय.यासाठी आज दुपारी१२ वाजता हे आंदोलन करण्यात येणारेय.























