Shahbaz Sharif | भारतानं निष्पाप लोक,मशिदी आणि शहरांना लक्ष्य केले, शाहबाज शरीफ यांच्या उलट्या बोंबा
Shahbaz Sharif | भारतानं निष्पाप लोक,मशिदी आणि शहरांना लक्ष्य केले, शाहबाज शरीफ यांच्या उलट्या बोंबा
India-Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धबंदी जाहीर करण्यात आली असली तरी, पाकिस्तान आपल्या कृत्यांपासून थांबलेला नाही. पाकड्यांनी पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवर आपला खरा चेहरा समोर केला आहे. शनिवारी (10 मे 2025) अनेक तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर युद्धबंदी जाहीर करण्यात आली. मात्र युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन (Pakistan Violates Ceasefire) केले. परिणामी, भारताने या हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर दिले आणि सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडले. दरम्यान, यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी त्यांच्या देशातील जनतेला संबोधित केले आणि खोट्या गोष्टींचा गठ्ठा सादर केला.सोबतच भारतावर युद्धाचा आरोप केला. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीन, सौदी अरेबिया, तुर्की, ब्रिटन, संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख आणि इतर अनेक व्यक्तिमत्त्वे आणि सहयोगी देशांचे भारतासोबत अलिकडेच झालेल्या युद्धबंदीसाठी केलेल्या भूमिकेबद्दल आभार मानले असले तरी त्यांनी आपल्या छुपा अजेंडा कायम ठेवत युद्धबंदीचे उल्लंघन केलं आहे. शत्रूविरुद्ध एका सन्माननीय राष्ट्रासाठी जे योग्य होते ते आम्ही केले- शाहबाज शरीफ युद्धाच्या भीतीने भारताला युद्धबंदीचे आवाहन करणाऱ्या पाकिस्तानने याला आपला विजय म्हटले. शाहबाज शरीफ म्हणाले, "हा आमच्या तत्वांचा आणि सन्मानाचा विजय आहे. आम्ही शत्रूविरुद्ध एका सन्माननीय राष्ट्रासाठी जे योग्य होते ते केले." हा केवळ सशस्त्र दलांचाच नाही तर संपूर्ण देशाचा विजय आहे." असे म्हणत शाहबाज शरीफ यांनी खोटा दावा केला आणि म्हटले की, भारताच्या राफेल लढाऊ विमानांना पाकिस्तानी हवाई दलाने लक्ष्य केले आणि पाडले. शाहबाज शरीफ यांनी लष्करी प्रतिष्ठाने आणि जलसाठ्यांवर हल्ला केल्याचे खोटे दावे केले. सोबतच त्यांनी बढाई मारली, "आम्ही शत्रूला अशा भाषेत उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे जी त्याला चांगली समजते. आम्ही स्पष्ट केले आहे की ज्या बैठका टेबलावर घ्यायच्या होत्या त्या आता युद्धभूमीवर होतील." असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या























