Pegasus Case : पेगॅसस तंत्रज्ञानाद्वारे हेरगिरीसाठी जगभरातले अनेक राष्ट्रप्रमुख टार्गेट?
ज्या इस्रायलच्या पेगॅसस हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे भारतातील विरोधी पक्षांचे प्रमुख नेते, पत्रकार आणि उद्योगपतींवर पाळत ठेवण्यात आली, याच तंत्रज्ञानानं जगभरातले काही आजी-माजी राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, खासदारांवर पाळत ठेवण्यात येणार होती. वॉशिंग्टन पोस्टनं हा गौप्यस्फोट करताना संभाव्य टार्गेट असलेल्या नेत्यांची यादीच प्रसिद्ध केली आहे. 10 पंतप्रधान, 3 राष्ट्राध्यक्ष, एक राजा आणि सात माजी पंतप्रधानांना लक्ष्य करण्यात आल्याचं त्यात म्हटलंय. 2019 मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या सरकारमधील 15 सदस्यांनाही टार्गेट केलं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे फ्रान्स सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत.























