एक्स्प्लोर
New Parliament : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर 20 विरोधी पक्षांचा बहिष्कार : ABP Majha
दरम्यान नव्या संसद भवनाच्या उद्धाटन कार्यक्रमावर २० विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकलाय.. काँग्रेस नेते राहुल गांधींनी राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन व्हावं अशी मागणी करत विरोध केला.. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट, आम आदमी पार्टी, जेडूयु, आरजेडी, डीएमके आणि तृणमुल काँग्रेससह अनेक पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला... तर दुसरीकडे एनडीएसह २५ पक्ष या सोहळ्याला हजर राहणार आहेत...
आणखी पाहा























