एक्स्प्लोर
Universe Stars Pune : पुण्यातील NCRAच्या शास्त्रज्ञांना यश, सूर्यापेक्षा मोठ्या अनोख्या ताऱ्यांचा शोध
पुण्यातील खगोल शास्त्रज्ञांनी रेडिओ लहरी उत्सर्जित करणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आठ ताऱ्यांचा शोध लावला आहे. जीएमआरटी म्हणजेच मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचा वापर करून शोधलेले हे तारे सूर्यापेक्षा काही पटींनी मोठे, अधिक तप्त आणि तीव्र चुंबकीय क्षेत्र असलेले आहेत. या ताऱ्यांच्या श्रेणीचं मेन सिक्वेन्स रेडिओ पल्स एमिटर्स असं नामकरण करण्यात आलंय. आतापर्यंत जगभरातील संस्थांकडून एकूण 15 एमआरपी शोधले गेले असून, त्यांपैकी 11 एमआरपी नारायणगाव जवळील जीएमआरटीच्या साह्याने शोधण्यात आले आहेत. त्यांतही आठ तारे चालू वर्षांत शोधले गेले आहेत.
आणखी पाहा























