(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Israel - Palestine युद्धाचा भारतावर काय परिणाम? Shailendra Deolankar यांचं विश्लेषण
Israel-Palestine War: रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्धानंतर जगात आता आणखी एका युद्धाचं (War) वादळ घोंघावत आहे. आता इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध (Israel-Palestine War) सुरू झालं आहे, इस्रायलने (Israel) या युद्धाची अधिकृत घोषणा केली आहे. शनिवारी (7 ऑक्टोबर) सकाळी पॅलेस्टिनी सशस्त्र सैनिकांनी जोरदार बॉम्बफेक करत गाझा पट्टीतून इस्रायलमध्ये घुसखोरी केली. त्यामुळे इस्रायलची दाणादाण उडाली आहे.
इस्रायलने केली युद्धाची घोषणा
पॅलेस्टाईनच्या 'हमास' या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर पाच हजारांहून अधिक रॉकेट डागले आहेत. पॅलेस्टाईनकडून झालेल्या या कृत्यामुळे चवताळलेल्या इस्रायलनेही आता युद्धाची घोषणा केली आहे. पॅलेस्टाईनने एकापाठोपाठ एक असे 5,000 रॉकेट हल्ले करून इस्रायलला रक्तबंबाळ केलं. या इस्रायलचे काही भाग उद्धवस्त झाले, इमारती ढासळल्या, यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा करताच अमेरिकेनेही इस्रायलला पाठिंबा दिला आहे.
इस्रायलकडून प्रतिहल्ल्याची तयारी
हमासने खासकरून दक्षिण आणि मध्य इस्रायलवर निशाणा साधला. त्यांनी दक्षिण परिसरातील सैन्य कॅम्पवर हल्ला चढवला. या हल्ल्यात इस्रायलचे 15 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनीही हमास या अतिरेकी संघटनेचं धाडस पाहता प्रतिहल्ल्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी इस्रायली सैनिकांना प्रत्येक भागात ठामपणे तैनात राहण्याचे आदेश दिले आहेत.
इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध
इस्रायलमधील सामान्य लोकांचा जीव धोक्यात येताच इस्रायली सैनिकांनी देखील हल्ला सुरू केला आहे. इस्रायली सैनिकही या अचानक आलेल्या आव्हानाचा जोरदार सामना करत आहेत. सोशल मीडियावर असे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत, जे पाहून तुम्हाला इस्रायलमधील सध्याच्या परिस्थितीचा अंदाज येईल. इस्रायल आणि हमास यांच्यातील या युद्धाशी संबंधित काही व्हिडिओ पाहूया...