Germany Working Hours : जर्मनीत 4 दिवसांच्या आठवड्याचा प्रयोग, 1 तारखेपासून 45 कंपन्यांचा प्रयोग
तुम्ही जर नोकरी करत असाल आणि केवळ चार दिवसांचा आठवडा असेल, म्हणजे तीन दिवस सुट्टी, तर तुमची तयारी असेल का? जर्मनीमध्ये असा प्रयोग खरंच करण्यात येणार आहे, आणि तोही येत्या १ फेब्रुवारीपासूनच. जर्मनीतल्या ४५ कंपन्यांनी या प्रयोगात भाग घेतला आहे. सहा महिन्यांसाठी हा प्रयोग राबवला जाणार आहे. चारज दिवसांचा आठवडा केल्यानं कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते का, याचा अभ्यास केला जाईल, आणि मग पुढील निर्णय घेतला जाईल. यामागचं कारण देखील महत्त्वाचं आहे. जर्मनीतील कुशल कर्मचाऱ्यांची संख्या दिवसागणिक घटत चालली आहे. त्यामुळे नोकऱ्या अधिक आणि कर्मचारी कमी अशी परिस्थिती आहे. यातच कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी काही जर्मन कंपन्यांनी हा प्रयोग करायचं ठरवलं आहे.



















