एक्स्प्लोर
Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातवर धडकणार, 74 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं
बिपरजॉय चक्रीवादळ आज दुपारी एक वाजता गुजरातवर धडकणार आहे. ताशी १२० ते १४५ किमी इतक्या भयंकर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून तब्बल ७४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हवलण्यात आलं आहे. गुजरातमध्ये NDRFच्या १८ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. लष्कर, नौदल आणि वायुदलाची देखील मदत घेण्यात आली आहे. किनारी जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. १००हून अधिक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. राजकोट विमानतळही खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण























