Al-Zawahiri :अल कायदाचा म्होरक्या जवाहिरीचा खात्मा, काबूलमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरी ठार
Al-Zawahiri : अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएने (CIA) अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अल-जवाहिरीला (Al-Zawahiri Killed) लक्ष्य करत ड्रोन हल्ला केला. या ड्रोन हल्ल्यात अल-जवाहिरी ठार झाला. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिमेतील हे अमेरिकेचे सर्वात मोठे यश आहे. ओसामा बिन लादेनच्या (Osama Bin Laden) खात्म्यानंतर अल कायदा या दहशतवादी संघटनेला हा सर्वात मोठा धक्का आहे. अल-जवाहिरीवर अमेरिकेने 25 दशलक्ष डॉलर इतक्या मोठ्या बक्षिसाची घोषणा केली होती. ओसामा बिन लादेनला अमेरिकेने 11 वर्षांपूर्वी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे केलेल्या कारवाईत ठार केले होते. त्यानंतर जवाहिरी हा अल कायदाचा प्रमुख झाला होता.























