Washim : वाशिममध्ये जैन समाजातील दिगंबर पंथीय आज रस्त्यावर उतरणार
वाशिममध्ये जैन समाजातील दिगंबरपंथीय आज रस्त्यावर उतरणार आहे... शिरपूर येथे मूर्तीचे लेपन करताना मूर्तीचं मूळ रूप बदलण्यात येत असल्याचा गंभीर आरोप दिगंबर पंथीयांनी केला आहे... या सर्व प्रकरणाला जिल्हा प्रशासन पाठिंबा देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे... पहिल्या लेपन प्रक्रियेमध्ये दिगंबर पंथियाना सोबत घेतले होते मात्र आता दुसऱ्या लेपन प्रक्रियेत दिगम्बर पंथीयांना बाजूला ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय तसंच सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनंतरही मंदिराची किल्ली केवळ एका पक्षकाराकडेच का असा सवाल करण्यात आलाय...
त्यामुळे जिल्हा प्रशासनाविरोधात दिगंबर पंथीयांकडून वाशिमच्या बालाजी मंदिरापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.























