एक्स्प्लोर
Sambhaji Bhide Washim : संभाजी भिडे वाशिम दौऱ्यावर, विरोधाच्या पार्श्वभूमिवर पोलिसांचा चोख बंदोबस्त
संभाजी भिडे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये त्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर काल यवतमाळमध्ये पंडित नेहरूंविरोधातही काही वक्तव्ये केलीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह, आंबेडकरी संघटना आणि काही सामाजिक संघटना संतप्त झाल्यात. त्यामुळे वाशिममधील कार्यक्रमाला विरोध होऊ शकतो, हे लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय.
आणखी पाहा























