एक्स्प्लोर
Wardha Lok Sabha : वर्ध्यात अमर काळे आज उमेदवारी अर्ज भरणार : ABP Majha
वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अमर काळे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज ते तुतारी चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल करतील. महत्त्वाचं म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वत: शरद पवार उपस्थित राहणार आहेत. शिवाय पक्षाकडून वर्ध्यात आज रॅलीचं आयोजन करण्यात आलंय.
आणखी पाहा


















