एक्स्प्लोर
Wardha : फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन; 1 वर्षानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत अपूर्णच
प्रशासकीय कामकाजाला गती येण्यासाठी वर्ध्यात सुसज्ज असे जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत बांधण्यात आलीय. या प्रशस्त इमारतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र एक वर्ष लोटूनही या इमारतीत प्रशासकीय कामकाजाला मात्र अद्याप सुरुवातच झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण सोहळ्यात या इमारतीची प्रशंसाही केली होती. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पणाला एक वर्ष लोटूनही प्रवेशद्वार बंद आहे. प्रशासनाच्या प्रवेशाचं घोडं एक वर्षापासून नेमकं अडलं कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
महाराष्ट्र


















