Amar Kale Wardha Loksabha : अमर काळे 2 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करतील
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर अमर काळे आता प्रचाराच्या कामाला लागले आहे. अमर काळे यांना शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दोन एप्रिल रोजी अमर काळे इंडिया अलायन्सच्या राष्ट्रवादी काँगेस पक्षाकडून उमेदवारी दाखल करणार आहे. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी वर्ध्यात असणार आहे, अशी माहिती अमर काळे यांनी दिली आहेय. विजयाचा विश्वास असल्याचे सांगत माजी आमदार अमर काळे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे. अमर काळे हे पंजा सोडून तुतारीवर लढणार असल्याने त्यांच्या समोर नेमकी कोणती आव्हाने आहेत आणि ते या निवडणुकीला कसे सामोरे जाणार हे जाणून घेत अमर काळे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी.


















