CM Threat | उद्धव ठाकरेंना कुणीही बोट लावू शकत नाही, काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांसोबत, वडेट्टीवर आणि थोरात यांची प्रतिक्रिया
मातोश्रीवर एक निनावी फोन आला होता. दाऊद गँगचा हस्तक असल्याचं त्यानं सांगितलं. त्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं. मात्र, मातोश्री उडवण्याबाबत धमकी दिलेली नाही, अशी माहिती परीवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. या कॉल बाबत पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली आहे. पोलीस याचा सखोल तपास करत आहेत, असेही ते पुढे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेबाबत आढावा घेतला जातो. तो अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आलेला असल्याचेही मंत्री परब यांनी सांगितले. दुबईहून मातोश्री वर तीन ते चार फोन आल्याची माहिती आहे. मात्र, यात मातोश्री उडवून देण्याची धमकी देण्यात आली नसल्याचे परब यांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेनंतर मातोश्री निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.






















