एक्स्प्लोर
Thane School : ठाण्यातील त्या शाळेचे पालक आक्रमक
Thane School : ठाण्यातील त्या शाळेचे पालक आक्रमक ठाण्यात एका शाळेतील घटनेने पालकवर्गाच्या चिंतेत भर टाकलीय.. प्रतिष्ठित अशा सी. पी. गोएंका शाळेत मुलांवर विनयभंगाची घटना समोर आल्यानंतर, आज पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन केले.. तसंच प्रशासनावर कठोर कारवाईची मागणीदेखील करण्यात आली... सी. पी. गोएंका इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता दुसरीचे विद्यार्थी.. मंगळवारी घाटकोपर येथील एका थीम पार्कमध्ये सहलीसाठी गेले होते.. यावेळी बसगाडीमध्ये खाद्य पदार्थाची पाकिटे वाटणाऱ्या व्यक्तीने, सात ते आठ विद्यार्थ्यांचा बसमध्ये विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली होती..
आणखी पाहा























