एक्स्प्लोर

Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल

Chhatrapati Sambhajinagar : बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेला त्यांचा गड देखील राखता आला नाहीये. ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची हि पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगर : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निकालाअंती बहुतांश ठिकाणी भाजपचं कमळ फुलल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे 25 वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation Election Result 2026) भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावलीय. तब्बल 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ  उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात. त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार, हे आता जवळ जवळ स्पष्ट झालं आहे

दुसरीकडे, बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शिवसेनेला त्यांचा गड देखील राखता आला नाहीये. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत (Chhatrapati Sambhajinagar Muncipal Corporation Election Result) ठाकरे गटाने 94 जागांवर उमेदवार दिले होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाला दोन आकडी विजयही मिळवता आलेला नाही. ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ सहा जागा मिळाल्या आहेत. या शिवसेना नेते अंबादास दानवे यांनाही भावाच्या पराभवामुळे फटका बसल्याचा दिसून आलं. या सर्व पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी समाज माध्यमांवर एक भावनिक पोस्ट करत भाष्य केलं. अंबादास दानवे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा एक फोटो आणि व्हिडीओ शेयर केलाय. यावर आपलेच फितूर निघाले तरी शेवटच्या श्वासापर्यंत लढू असं लिहलं आहे. ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची हि पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Ambadas Danve - अंबादास दानवे (@iambadasdanve)

Ambadas Danve on BJP : पैशाची वृष्टी भाजपच्या आकाशातून झाली. धो-धो पैशाचा पाऊस झाला

एकीकडे बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचा गड राखता आला नाही. दुसरीकडे शिंदे गटाला ही छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 जागाच मिळाल्या असून भाजपने बहुमताचा आकडा गाठल्याचा चित्र आहे. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले कि, पराभव मान्य केला पाहिजे. 35 ठिकाणी आम्ही दुसऱ्या क्रमांकावर राहिलो आहे. आमचे 7 ठिकाणी विजय झाले. आम्ही प्रचार चांगला केला होता, मात्र पैशाची वृष्टी भाजपच्या आकाशातून झाली. धो-धो पैशाचा पाऊस झाला. 14 तारखेला 25 टक्के मतदान झाल्याची घटना घडली, अशी तक्रार आहे. मतदान रीसेट झाले अशीही तक्रार झाली आहे. या शहराला भाजपने पाणी दिले नाही, तरी जनतेने भाजपला निवडून दिले आहे. जनतेच्या मनात काही असेल तर शुभेच्छा, असेही अंबादास दानवे म्हणाले.

Ambadas Danve : हरलो हे आमचे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे दुर्दैव

मात्र, सत्तेपुढे शहाणपण टिकत नाही, हे सत्य आहे. हरलो हे आमचे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे दुर्दैव आहे. यांच्याकडे सर्व उपलब्ध असताना ते 11,12 पर्यंत पोहोचविले. आम्हला संपविले मात्र त्यांचे जे कलीग आहे. त्यांना तरी संपवायला नको होतं. येणाऱ्या काळात निवडून आलेले 70 लोक मुंबईला दिशा देतील. आमचे सगळे गेले तरी आम्ही 70 जगा जिंकल्या. हे काही कमी नाही. असेही ते म्हणाले.

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Embed widget