Jitendra Awhad Resignation of MLA : लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही : जितेंद्र आव्हाड
महाविकास आघाडीच्या सरकारमधले गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत एक मोठा बॉम्ब फोडलाय.. आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलंय. पोलिसांनी ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय.. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही असं जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलंय. हर हर महादेव सिनेमावरुन विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तर काल कळवा-मुंब्रा नवीन पुल उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान महिलेनं विनयभंगाचा आरोप केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला... हे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं ट्विट केलंय.