Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणी कारवाई, अमुदान कंपनीचा मालकाला अटक
अमुदान कंपनीच्या मालक मालती मेहता पोलिसांच्या ताब्यात ------------ डोंबिवली स्फोट प्रकरणी पोलिसांची कारवाई ------------ नाशिकच्या मेहेरधाम परिसरातून मालती मेहता ताब्यात
ठाणे : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी (Dombivli MIDC Explosion) पहिली अटक झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून नाशिकमधील मेहेरधाम परिसरातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. बॉयलर स्फोटप्रकरणी कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवलीतील रिअॅक्टर स्फोटात मृतांचा आकडा 11 वर पोहोचला आहे.
डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान स्फोटातील मुख्य आरोपी मालती मेहता या नाशिक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी रात्रीपासून नाशिक क्राईम ब्रांच युनिट एक आणि आणि ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करत त्यांना अटक केली आहे.