एक्स्प्लोर
Pratap Sarnaik On Dahihandi : नऊ थराचा रेकॉर्ड तोडणाऱ्यांना गोविंदा पथकास 21 लाखाचे बक्षीस
ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात नऊ थरांपेक्षा अधिक थर लावणाऱ्या गोविंदा पथकासाठी २१ लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. या दहीहंडीत पहिल्यांदा नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला ११ लाखांचं इनाम देण्यात येणार आहे. त्यानंतर नऊ थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला ५ लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. नऊपेक्षा कमी थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी यंदा बक्षिसाची रक्कम दुप्पट करण्यात आली असल्याची माहिती आमदार सरनाईक यांनी दिली आहे. या दहीहंडी उत्सवासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
आणखी पाहा























