एक्स्प्लोर
Tata Digital Payments : टाटा समूह डिजिटल पेमेंटच्या जगतात? 7 एप्रिल रोजी घोषणा होण्याची शक्यता
लवकरच टाटा समूह डिजिटल पेमेंटच्या जगतात पाऊल ठेवणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे अॅमेझॉन पे,फोन पे, गुगल पे आणि पेटीएम या डिजिटल पेमेंट जगतात स्पर्धा तीव्र होऊ शकते. टाटा लवकरच युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआय पेमेंट अॅप लॉन्च करू शकते. कंपनीला यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळणार आहे. मंजुरी मिळताच कंपनी आपली युपीआय सेवा सुरू करू शकते. टाटा समूहाने या डिजिटल पेमेंट अॅपला 'टाटा न्यू' असे नाव दिले आहे आणि अशी अपेक्षा आहे की समूह येत्या आयपीएल सत्राच्या दरम्यान अॅप लॉन्च करू शकेल असा अंदाज असून याबाबत घोषणा 7 एप्रिल रोजी केली जाऊ शकते.
आणखी पाहा























