Special Report Pak : पाकच्या दहशतवादाविरोधात दोन जुने मित्र एकत्र? अफगाण, तालिबान सुटले?
Special Report Pak : पाकच्या दहशतवादाविरोधात दोन जुने मित्र एकत्र? अफगाण, तालिबान सुटले?
पाकिस्तान हा असा शेजारी आहे ज्याचा सध्या आजूबाजूच्या सगळ्या शेजाऱ्यांना त्रास आहे. चीनचा अपवाद वगळता दहशतवादी पाकिस्तानचा जाच सहन करणारा आणखी एक देश म्हणजे अफगाणिस्तान. अफगाणिस्तानात भारतासोबत चांगले संबंध हवे असं मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र धर्माच्या नावावर पाकिस्तानन अफगाणिस्तानला आपली जिहादी प्रयोगशाळा बनवलं. त्या कचाड्यातून सुटण्याचा अफगाणिस्तानचा प्रयत्न सुरू असतो त्याचेच संकेत गेले काही दिवस मिळतायत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधील अंतरही सातत्याने वाढत असल्याची चर्चा महत्त्वाची आहे. महत्वाचं म्हणजे भारतान अजूनही अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमधील संभाषणाचे अनेक अर्थ लावले जात आहेत. भारत नेहमीच अफगाणिस्तान नागरिकांच्या हिताच्या बाजून उभा राहिला. तालिबान सत्तेत येण्यापूर्वी भारतान अफगाणिस्तानात मोठी गुंतवणूक केली ज्यामध्ये रस्ते, रुग्णालय, वीज यासारखे मोठे प्रकल्प समाविष्ट आहेत. यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये दुबईत भारत आणि अफगाणिस्तानच्या अंतरिम सरकार मध्ये चर्चा झाली होती. या बैठकीला भारताचे परराष्ट्र सचिव आणि अफगाणिस्तानचे कार्यवाहक, परराष्ट्र मंत्री उपस्थित होते. या आधीही काबुल मध्ये काही बैठका झाल्या, परंतु ती माहिती सार्वजनिक केलेली नाही. पाकिस्तान सरकार अफगाणिस्तानच्या जनतेच्या विरोधात उभ आहे. पाकचा हस्तक्षेप वाढल्यामुळे अफगाणिस्तान मध्ये असंतोष वाढलाय. ज्या पाकिस्तानने अफगाणिस्तान मध्ये. तालिबानची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केलेले होते, त्याच पाकिस्तान बरोबर तालिबानचा जो विसंवाद सुरू झालेला आहे, तो विसंवाद ऑपरेशन सिंधुर दरम्यान प्रतिबिंबित होताना आपल्याला दिसून येतो. ज्या पाकिस्तानला तालिबानच्या मदतीची आणि समर्थनाची अपेक्षा होती, त्या तालिबानने मात्र ह्या संपूर्ण संघर्षामध्ये पूर्णतः तटस्थ भूमिका घेतलेली होती. किंभहुना अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानला भारत विरोधी करू दिलेला नाहीये. हा आपला एक मोठा राजनैतिक विजय आहे असा. कोणत्या प्रकारच्या चर्चा होतात आणि त्यात काय ठरत हे पाहणं महत्त्वाच आहे.
महत्त्वाच्या बातम्या





















