Zero Hour Pandharpur Vitthal Mandir : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गुप्त खोलीत काय काय सापडलं?
Zero Hour Pandharpur Vitthal Mandir : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गुप्त खोलीत काय काय सापडलं?
सोलापूर: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या (Pandharpur Vitthal Mandir) संवर्धनाचं काम सुरु असतानामोठं गूढ उलगडलं. गुरुवारी रात्री 2 वाजता हनुमान गेटजवळ दोन दगडी फरशा खाली पोकळ भाग जाणवल्यावर या कामगारांनी ते दगड हलवून पहिले. त्यावेळी त्याच्या खाली अरुंद तळघर असल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर शुक्रवारी दुपारी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पुरातत्व विभागाच्या टीमला पाचारण केले
शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान या तळघरावरील दगड काढून आत कर्मचारी उतरले असता समोरच्या बाजूला जवळपास 8 फूट लांब आणि 6 फूट उंच अशी खोली दिसून आली. यानंतर सुरक्षेचे नियम पळत येथे कर्मचारी उतरवून त्यांनी येथे तपासणी केली असता यात भुयारी खोलीत काही जुन्या मुर्ती असल्याचे समोर आले.