एक्स्प्लोर
Pandharpur : नववर्षानिमित्त मंदिराला फुलांची आकर्षक आरास, भक्तांची प्रचंड गर्दी
सरत्या वर्षाला विठुरायाच्या दर्शनाने निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक आणि भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाले असून मंदिर प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे . राज्यभरात अनेक ठिकाणी मंदिरे रात्रभर उघडी ठेवली जाणार असली तरी विठ्ठल मंदिर मात्र नेहमीच्या वेळेत बंद होणार आहे . आज मात्र नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मंदिराला रात्री फुलांची आकर्षक आरास केली जाणार आहे . गेली दोन वर्षे कोरोना संकटात गेल्यानंतर सरते वर्ष निर्बंध मुक्त आणि चांगले गेल्याने येते वर्ष देखील संकट मुक्त जावे हीच भावना घेऊन देशभरातील हे पर्यटक आणि भाविक विठ्ठल चरणी आले आहेत
आणखी पाहा























