Deepak Kesarkar यांच्या मतदार संघात आदित्य ठाकरेंचा मेळावा, कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी
एकीकडे संजय राऊत यांच्या अटकेमुळे शिवसेनेला हादरा बसला असताना शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज तळकोकणातून त्यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करत आहेत. आदित्य ठाकरे आज सकाळी चिपी विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर कुडाळ आणि सावंतवाडी इथं ते जाणार आहेत. सावंतवाडीत बंडखोर आमदार केसरकर यांच्या घरासमोरून रॅली काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात दुपारी शिवसेनेचा मेळावा होणार आहे.केसरकरांनी केलेल्या टीकेला सावंतवाडीतील मेळाव्यात आदित्य ठाकरे काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे. याशिवाय राणे पिता-पुत्रांवर आदित्य ठाकरे टीका करणार का याचीही उत्सुकता आहे. संध्याकाळी आदित्य ठाकरे यांचा कोल्हापुरात मेळावा आहे.























