Gram Panchayat Election Result | चंद्रकांत पाटलांना गावही राखता आलं नाही, शिवसेनेचा सहा जागांवर विजय
कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच मूळगावात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपला शिवसेनेने झटका दिला आहे. शिवसेनेने नऊ पैकी सहा जागांवर विजय मिळवला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या या खानापूर गावात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष शिवसेनेच्या विरोधात एकत्र आले होते. त्यामुळे या युतीची चर्चा जिल्हाभर होती. परंतु शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी इथे सत्ता राखण्यात यश आलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी गावात जातीने लक्ष घातलं होतं. त्यामुळे निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. परंतु शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पॅनलने त्यांना जोरदार धक्का दिला आणि सहा जागांवर विजय मिळवला.























