Sharad Pawar यांनी राज ठाकरेंच्या प्रत्येक टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय : ABP Majha
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी काल ठाण्यातल्या सभेत विशेष करून लक्ष्य केलं ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना... आणि आज शरद पवारांनी राज ठाकरेंच्या प्रत्येक टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.. पवार शिवरायांचं नाव घेत नाहीत, मंदिरात जात नाहीत, हे राज ठाकरेंचे दावे खोडून काढताना शरद पवारांनी अमरावतीच्या कार्यक्रमाची आणि मंदिरात फोडल्या जणाऱ्या प्रचाराच्या नारळाची आठवण करून दिली ... शिवरायांवर लिखाण करणाऱ्या पुरंदरेंवर टीका होते असा आरोप काल राज ठाकरेंनी केला होता. त्याला देखील शरद पवारांनी उत्तर दिलंय...पुरंदरेंनी दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारावर जेम्स लेननं लिखाण केलं.... आणि त्यावर टीका करण्यात काहीच चूक नसल्याचं पवार म्हणाले. थोडक्यात राज ठाकरेंनी उपस्थित केलेला प्रत्येक मुद्दा शरद पवारांनी खोडून काढलाय.






















