Udayanraje Bhosle : साताऱ्यात उद्या उदयनराजेंचा भव्य सत्कार; लोकसभेचा आग्रह राष्ट्रवादीनं सोडला?
बातमी आहे सातारा आणि नाशिक मतदारसंघाबद्दल.. साताऱ्यात उद्या उदयनराजेंचा भव्य सत्कार केला जाणार आहे अशी पोस्टर्स फिरू लागली आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला बारामती, रायगड, शिरूर, नाशिक आणि परभणी या पाच जागा मिळणार अशी माहिती मिळतेय. आणि म्हणूनच, राष्ट्रवादीने साताऱ्यावरील आग्रह सोडला का, असा प्रश्न निर्माण होतोय. दुसरीकडे सातारा लोकसभा भाजपला सुटत असेल तर बदल्यात नाशिक आम्हाला सोडा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपकडे करतंय. यामध्ये एकनाथ शिंदेंची मात्र मोठी अडचण झाली आहे. कारण नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद नाही, त्यामुळे ती जागा आम्हाला सोडा अशी भाजप आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे पण हेमंत गोडसे हे शिवसेनेचे विद्यमान खासदार असताना आम्ही नाशिक लोकसभा सोडणार नाही अशी शिॅदेंची भुमीका आहे.























