(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut Threat : दिल्लीत आल्यावर AK47 ने उडवून टाकू , संजय राऊतांना धमकी
Sanjay Raut : शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्लीत आल्यावर AK47 ने उडवून टाकू असा धमकीचा मेसेज राऊतांना आला आहे. लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून धमकी मिळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय राऊत धमकी प्रकरणी पुण्यातून (Pune) दोन जणांना ताब्यात घेतले आहे. काल राऊत यांच्या मोबाईलवर धमकीचे मेसेज आले होते. दरम्यान, संजय राऊत यांच्या घरी चौकशीसाठी पोलिस आले आहेत. पण सध्या संजय राऊत हे सामना ऑफिसमध्ये गेले असून घरी त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत आहेत. सुनील राऊत यांच्याकडे पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातून राहुल तळेकर ( वय साधारण 23) या तरुणाला पुण्यातील गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा अटक केली आहे. ही अटक पुण्यातील खराडी भागातून करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आणि पुणे पोलिस यांच्या गुन्हे शाखेनं संयुक्त कारवाई केली आहे. राहुल तळेकरला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.