Uddhav Thackeray Speech Sangli : चंद्रहारला उमेदवारी, मोदी-शाहांवर हल्ला, ठाकरेंचं सांगलीतील भाषण
Uddhav Thackeray Speech Sangli : चंद्रहारला उमेदवारी, मोदी-शाहांवर हल्ला, ठाकरेंचं सांगलीतील भाषण चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करतो, दिल्ली जाणार, मर्द दिला आहे,त्याला जिंकून देण्याचा मर्द पणा दाखवा... "चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करतो. चंद्रहार दिल्लीत जाणार आहे. मर्द दिला आहे, त्याला जिंकून देण्याचा मर्द पणा दाखवा", असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. आम्ही भाजपला सोडलं हिंदूत्व सोडलं नाही. दुसऱ्या धर्माचा द्वेष करणे हे छत्रपतींनी शिकवलं नाही. महाराष्ट्र लुटायचा प्रयत्न कराल, तर औरंगजेब वृत्तीला मुठमाती दिल्याशिवाय राहणार नाही", असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. सांगली येथे उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.























