Sangli Fake Currency ; तुमच्या खिशातही बनावट नोट? 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात
तुमच्या खिशातली ५० रूपयांची नोट बनावट आहे का तपासून घ्या...
आम्ही असं म्हणतोय कारण तब्बल ४० लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याचं उघड झालंय. सांगली पोलिसांनी कारवाई करत अटक केलेल्या मिरजच्या अहद शेखने ४० लाखांच्या बनावट नोटा चलनामध्ये आणल्याचं चौकशीत उघड झालंय. ५० रूपयांच्या या हुबेहूब बनावट नोटा आहेत. अहद कडून सव्वा दोन लाखांचा प्रिंटर, लॅपटॉप जप्त केला आहे. त्याच्याकडून नोटा घेणाऱ्या एजंटाचा शोध सुरू आहे. कसून चौकशी केली असता मिरजेत त्याचा बनावट नोटा तयार करण्याचा छापखानाच सुरू केल्याचे उघडकीस आला. अहदच्या या कारनाम्यामागे आंतरराज्य कनेक्शन असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केलाय. ७० रुपयाला बनावट शंभर रुपये तो देत असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे त्याच्या एजंटाचा शोधही पोलीस घेत आहेत.























