Sangli Masjid : सांगलीतील वादग्रस्त मशिदीच्या जागेवरील अतिक्रमण पाडणार- पालिका आयुक्तांची माहिती
कुपवाड मधील मंगलमूर्ती कॉलनीतील वादग्रस्त जागेची ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला. महापालिकेचे उपायुक्त अतिक्रमण विरोधी पथकासह वादग्रस्त जागेच्या ठिकाणी दाखल. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सांगलीच्या कुपवाड नजीक अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे त्या वादग्रस्त जागेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. साधारण महिन्याभरापूर्वी याठिकाणी मशीद बांधकामाच्या वादातून दोन गटात मारामारीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी १५ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. पण यानंतर आता सांगलीतील वादग्रस्त मशीदीच्या जागेवरील अतिक्रमण पाडणार असल्याची माहिती सांगली-कुपवाड महानगरपालिका आयुक्त सुनील पवार यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या













