Sangli : धक्कादायक! सांगलीत अंत्रश्रद्धेचा बळी! मांत्रिकाच्या मारहाणीत 14 वर्षीय मुलाचा मृत्यू
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील आर्यन दिपक लांडगे या 14 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झालाय. पण या मुलाचा मृत्यू हा कर्नाटकातील एका मांत्रिकाच्या मारहाणीत झाल्याचा आरोप करण्यात आलाय. मांत्रिकाच्या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. आर्यनला सतत ताप येत होता. तो लवकर बरा होत नव्हता. म्हणून आर्यन एका नातेवाईक महिलेने तिच्या मांत्रिक वडीलांकडे आर्यनला कर्नाटकातील कुडची जवळील शिरगूर या गावातील एका मांत्रिकाकडे उपचारासाठी त्याला नेले होते. त्या मांत्रिकाने सांगितले की, मुलाला बाहेरची बाधा झाली आहे, त्यांच्या अंगात भूत शिरलं आहे, ते बाहेर निघत नाही.























