Advocate Ujjwal Nikam | सुशांत सिंह प्रकरणावरून दोन राज्यातील पोलिसांतले संबंध अधिक ताणू नयेत - उज्ज्वल निकम
सुशांत सिंह प्रकरणात आता मुंबई पोलिसांच्या हाती काहीच राहिलेलं नाहीय, रिमांड, आरोपपत्र, खटला सारं काही पाटना, बिहारमध्ये झालं. मात्र हा निकाल इतर प्रकरणांत उदाहरण म्हणून लागू राहणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं असल्यानं पुन्हा असा प्रसंग उद्भवण्याची शक्यता कमी आहे अशी माहिती ॲड. उज्ज्वल निकम यांनी एबीपी माझाला दिली. दोन्ही राज्यातील पोलिसांनी आपापसातले संबंध अधिक ताणू नयेत, अथवा महाराष्ट्रातील गुन्हेगारांना परदेशात पळून जाण्याची गरजच वाटणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे राजकारण्यांनीही हा विषय आता इथंच संपवावा त्याचं उगाच राजकारण करू नये, जेणेकरून या प्रकरणातील खऱ्या गुन्हेगारांना त्याचा फायदा होईल अशी भावना अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे.






















