Kasba Bypoll Election Controversy : कसब्यात कोण वाटतंय पैसे, धंगेकरांचा आरोप, भाजपचं प्रत्युत्तर
कसबा पेठ पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उपोषण मागे घेतलंय.... सकाळी ११ वाजता त्यांनी उपोषण सुरू केलं होतं... प्रचाराची मुदत संपल्यानंतर भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटल्याचा आरोप धंगेकरांनी केला होता... आणि त्याच्या निषेधार्थ त्यांनी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण सुरू केलं होतं... दरम्यान, पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर धंगेकरांनी उपोषण मागे घेतलंय... मात्र या सगळ्या घडामोडीमुळे या पोटनिवडणुकीचा प्रवास, आधी भाषणांमधून नेत्यांच्या बाता, त्यानंतर कार्यकर्त्यांच्या एकमेकांना लाथा आणि आता रुपयांच्या नोटा, अशा मार्गाने होत असल्याची चर्चा कसबा आणि चिंचवडमध्ये रंगलीय.























