![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कसा घडला अपघात? मृताचे नातेवाईक म्हणाले...
Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर कसा घडला अपघात? मृताचे नातेवाईक म्हणाले...
पुणे पोर्शे अपघातानंतर (Pune Porshe Accident) आणखी एका भीषण अपघातानं (Pune Nashik Highway Accident) पुणे (Pune News) हादरलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका आमदाराच्या पुतण्यानं आपल्या गाडीनं दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवल्याचा प्रकार घडला. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आमदाराचा पुतण्या अपघातानंतर तिथून निघून गेला, त्यानं अपघातग्रस्तांना कोणतीही मदत केलेली नाही. तसेच, अपघातावेळी त्यानं मद्यप्राशन केलं होतं, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) कळंबमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचालकानं दोघांना चिरडलं असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या (Dilip Mohite Patil) पुतण्याकडून हा अपघात झाला आहे. या प्रकरणी मोहिते पाटलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार दिलीप मोहिते पाटलांचा पुतण्या कार चालवताना दारुच्या नशेत होतो, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
![Pune Winter Cold : गुलाबी थंडीने पुणे गारठलं; 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/17/9e89401a783080fc9b4c1ee96edc41801734416270049719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Pune Datta Jayanti 2024 : पुण्यात दत्त मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/14/2efca6b695b2bd0c752cd7e680fb56281734159999404718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Gold Datta Idol : पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/12/8cb32e01fa45a57cf360dca0ce87b8bd173401606907790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Helmet Compulssion: पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचं समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/02/389b97e08c21c5268424768d5d896c611733122795485719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Punekar on CM Maharashtra : मुख्यमंत्री कोण हवा, पुणेकरांचं मत काय...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/28/0033cd76d509fd34f440ff2c90c86bdd1732771583945719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)