एक्स्प्लोर

Australia vs India, 3rd Test : जर टीम इंडिया गाबा कसोटीत हरली तर WTC फायनलमधून बाहेर? आता नवीन समीकरण तयार!

Australia vs India 3rd Test : सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचे 10 सामन्यांत 6 विजय, 3 पराभव आणि एक बरोबरीत 76 गुण आहेत.

Australia vs India 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाची अवस्था बिकट आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ अपयशी ठरला आहे. पराभवाचे सावट सुद्धा आहे. पावसाचा खेळ झाल्यास कसोटी अनिर्णित होण्याची शक्यता आहे.  

उर्वरित दोन्ही कसोटी सामने जिंकावे लागतील

दरम्यान,  जर गाबा कसोटी अनिर्णित राहिली, तर भारतीय संघाला WTC अंतिम फेरीत सहज पोहोचण्यासाठी उर्वरित दोन्ही कसोटी सामने जिंकावे लागतील.  जर भारतीय संघ गाबा कसोटीत पराभूत झाला तर अंतिम फेरी गाठण्यासाठी उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील. तसेच, श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोनपैकी किमान एक कसोटी अनिर्णित राहील अशी अपेक्षा करावी लागेल. मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली तरी भारत अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो. मात्र, त्यानंतर श्रीलंकेने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 किंवा 2-0 ने जिंकली पाहिजे, अशी आशा त्यांना बाळगावी लागेल. 

WTC टेबलवर सध्या दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व आहे

सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचे 10 सामन्यांत 6 विजय, 3 पराभव आणि एक बरोबरीत 76 गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेची गुणांची टक्केवारी 63.33आहे, जी ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचे 14 सामन्यांत 9 विजय, 4 पराभव आणि 1 ड्रॉसह 102 गुण आहेत. त्याच्या गुणांची टक्केवारी 60.71 आहे. सध्या तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारताचे 16 सामन्यांत 9 विजय, 6 पराभव आणि एक बरोबरीत 110 गुण आहेत. त्याच्या गुणांची टक्केवारी 57.29 आहे. भारताला सध्याच्या सायकलमध्ये आणखी 3 सामने (गब्बा कसोटीसह) खेळायचे आहेत, जे फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत.

श्रीलंकेचा संघ चौथ्या क्रमांकावर असला तरी त्याची अंतिम फेरी गाठण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. श्रीलंकेला 47.45 टक्के गुण आहेत आणि ते कमाल 53.85 टक्के गुणांपर्यंत पोहोचू शकतात. इंग्लंड पाचव्या तर न्यूझीलंड सहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान सातव्या, बांगलादेश आठव्या आणि वेस्ट इंडिज नवव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश आणि वेस्ट इंडिज हे संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे हे तिसरे पर्व आहे, जे 2023 ते 2025 पर्यंत चालणार आहे. आयसीसीने या तिसऱ्या सायकलसाठी पॉइंट सिस्टमशी संबंधित नियम आधीच जारी केले आहेत. कसोटी सामना जिंकल्यास संघाला 12 गुण, सामना अनिर्णित राहिल्यास 4 गुण आणि सामना बरोबरीत सुटल्यास 6 गुण मिळतील.

त्याच वेळी, सामना जिंकण्यासाठी 100 टक्के, टायसाठी 50 टक्के, ड्रॉसाठी 33.33 टक्के आणि पराभवासाठी शून्य टक्के गुण जोडले जातात. दोन सामन्यांच्या मालिकेत एकूण 24 गुण उपलब्ध आहेत आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 60 गुण उपलब्ध आहेत. पॉइंट टेबलमधील रँकिंग प्रामुख्याने विजयाच्या टक्केवारीच्या आधारे निश्चित केली जाते. WTC च्या सध्याचा अंतिम सामना 11-15 जून 2025 दरम्यान क्रिकेट लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
PHOTO : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
Sunita Williams : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
Video : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 19 March 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNagpur Crime Update | त्या रात्री जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग, वर्दी खेचण्याचा केला प्रयत्नABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 19 March 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सNagpur Update | नागपुरातील हिंसारग्रस्त परिसर वगळता नागपुरातील जनजीवन सामान्य,वाहतूक सेवा नियमितपणे सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
PHOTO : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
Sunita Williams : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
Video : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
Embed widget