Pune : पुण्यातील अलिशान कारचालकाची मुजोरी, धडक दिलेल्या दुचाकीस्वार तरुणीलाच केली मारहाण ABP Majha
गाडी सावकाश चालवण्याची विनंती करणाऱ्या तरुणीला कारचालकानं दांडक्यानं मारहाण केली. पुण्यातल्या फातिमानगर परिसरात शुक्रवारी ही धक्कादायक घटना घडली. वैष्णवी ठुबे असं पीडित तरुणीचं नाव असून ती राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू असल्याची माहिती मिळतेय. कारचालकानं केलेल्या मारहाणीत वैष्णवीच्या हाताचं हाड दुखावलं आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी कारचालक सुमित टिळेकर आणि एका महिलेवर गुन्हा नोंदवलाय. सुमित वाहतुकीच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करत बेदरकारपणे गाडी चालवत होता. यावेळी त्याच्या बीएमडब्ल्यू कारची वैष्णवीच्या दुचाकीला मागून धडक बसली. त्यावेळी वैष्णवीनं सुमितला गाडी सावकाश चालवण्यास सांगताच सुमित टिळेकरनं वाईट शिवीगाळ केली आणि फातिमानगर चौकात तिची गाडी थांबवून तिला लाकडी दांडग्यानं मारहाण केल्याचा आरोप वैष्णवीनं केलाय.























