(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pooja Khedkar : MBBSला असतानाचं पूजा खेडकरांचं सर्टिफिकेट समोर
Pooja Khedkar : MBBSला असतानाचं पूजा खेडकरांचं सर्टिफिकेट समोर वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई, मनोरमा अद्याप पुणे पोलिसांसमोर हजर झाले नसून त्यांच्या बंगल्याला भलं मोठं कुलूप लावण्यात आल्याचं समोर आलं आहे. पोलिस येऊन गेल्यानंतर हे कुलूप कुणी लावलं असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सोमवारी सकाळी पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक या बंगल्यावर दाखल झाले होते, मात्र त्यांना घरातून कोणीही प्रतिसाद दिला नव्हता. मात्र आता या बंगल्याला एक मोठं कुलूप लावण्यात आले आहे. हे कुलूप नेमके कोणी लावले? पोलिस येऊन गेल्यानंतर हे कुलूप कधी लावले असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत माहिती देताना पोलिस म्हणाले, आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. त्यांचे मोबाईल देखील बंद आहेत. ते सापडल्यानंतर आम्ही कायदेशीर कारवाई करू. जो गुन्हा झाला आहे त्याबाबत आम्ही त्यांना काही प्रश्न विचारून माहिती घेऊ. एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील काहीचे मोबाईल नंबर आमच्याकडे नाहीत. त्या सर्वांचा शोध सुरू आहे. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत.