Pooja Khedkar IAS Case : पिस्तूल दाखवणाऱ्या Manorama Khedkar यांना धक्का,पोलिसांची थेट नोटीस
Pooja Khedkar Police Notice : पिस्तूल दाखवणाऱ्या Manorama Khedkar यांना धक्का,पोलिसांची थेट नोटीस
Akola News अकोला : प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांची सध्या राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे. पूजा खेडकर यांची नियुक्ती, यूपीएससी परीक्षा देताना त्यांनी सादर केलेले दिव्यांग असल्याचे प्रमाणापत्र, नॉन क्रिमेलियरचे प्रमाणपत्र असे सर्वकाही संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. याच कारणामुळे त्यांची पुण्याहून (Pune) थेट वाशिमला बदली करण्यात आली होती. दरम्यान, पुणे, वाशिमनंतर आता पूजा खेडकरांची बदली अकोल्यात (Akola News) करण्यात आली आहे. उद्या, सोमवार 15 जुलै पासून 19 जुलै पर्यंत अकोला येथील प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग म्हणून त्या आठवडाभर कामकाज प्रशिक्षण करिता हजर होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तर त्यानंतर 22 जुलै पासून त्या विविध शासकीय अधिकारी यांची भेट घेऊन कामकाजाचा अनुभव घेणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
