PM Narendra Modi Sabha : मोदींच्या सभेसाठी पुण्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
PM Narendra Modi Sabha : मोदींच्या सभेसाठी पुण्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पुण्यातील नरेंद्र मोदींच्या रेस कोर्सच्या सभेला पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या पुणे जिल्ह्य़ातील चारही लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी गर्दी केलीय. एकीकडे नरेंद्र मोदी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, माढा या प्रत्येक मतदारसंघात प्रचार सभा घेत असताना पुणे जिल्ह्य़ातील बहुचर्चित बारामती लोकसभा मतदारसंघात मात्र मोदींची सभा होत नाहिये. त्याऐवजी पुणे जिल्ह्य़ातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी संयुक्त सभा पुण्यात होतेय. याबाबत बारामती हून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना काय वाटतय हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.






















