(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MBBS : एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना 'नॅशनल एक्झिट टेस्ट' बंधनकारक
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने एम बी बी एस कोर्स पूर्ण केल्यानंतर देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील अशा सर्व विद्यार्थ्यांची " नॅशनल एक्झिट टेस्ट " अर्थात " NEXT " घेण्याचा निर्णय २०१९ साली घेतला आहे . यामुळे देशातील चांगल्या गुणवत्ता धारक डॉक्टरांची संख्या वाढविणे असा आहे. त्यामुळे यावर्षी देशातील एम. बी. बी. एस. च्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार असल्याची शक्यता आहे. त्यानुसार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशातील सर्व राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाना पत्र पाठवून अंतिम वर्ष एम बी बी एस च्या विद्यार्थ्यांची माहिती व ते कधी कोर्स पूर्ण करतील..? याविषयी माहिती मागितली आहे. त्यानंतर येत्या जून महिन्यात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची NEXT परीक्षे संबंधी तारीख निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यंदा एम बी बी एस च्या अंतिम वर्षाला असणाऱ्या देशातील सर्वच विद्यार्थ्यांना ही परीक्षा याच वर्षी द्यावी लागणार असल्याची चर्चा आहे.