Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीतील प्रदुषणामुळे वारकऱ्यांमध्ये रोष
Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीतील प्रदुषणामुळे वारकऱ्यांमध्ये रोष संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर येऊन ठेपला असताना, आज ही इंद्रायणी नदी फेसाळलेली आहे. या इंद्रायणी नदीकडे दुर्लक्ष करून गेल्या सात वर्षांपासून सरकारकडून वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरुये. मात्र आता प्रस्थानापूर्वी इंद्रायणी नदीनं मोकळा श्वास घेतला नाही, तर एका ही सत्ताधारी नेत्याला आळंदीत फिरकू देणार नाही. असा इशारा इंद्रायणी नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या आंदोलकांनी दिलाय. पिंपरी चिंचवडमधील काही मूठभर कंपन्या नदीत रसायनयुक्त पाणी सोडून, नदीत विष कालवतायेत. मात्र या कंपन्यांचा बंदोबस्त हे सरकार लावू शकत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. यामुळं वारकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय. कारण याच इंद्रायणीत पवित्र स्नान करुन वारकऱ्यांना माऊलींच्या चरणी माथा टेकवावा लागणार आहे, परिणामी वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यामुळं इंद्रायणीला मोकळा श्वास निर्माण करून द्या, या वारंवार केल्या गेलेल्या मागणीकडे सरकार सातत्यानं दुर्लक्ष करत आलंय. त्यामुळं वारकरी, गावकरी आणि देवस्थान संताप व्यक्त करतोय. याचअनुषंगाने आता इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी वारंवार आंदोलन छेडणाऱ्या आंदोलकांनी थेट सत्ताधारी नेत्यांना इशारा दिलाय. आढावा घेतलाय नाजिम मुल्ला यांनी.
![Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/116cd530074c15bf7868c19823f2f3481738214113190718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Supriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/f38c1a0020e0a3e99f28277d5730d2791738210178849718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Baburao Chandere : Vijay Raundal यांनी पोकलेनच्या ड्रायव्हरला दगड मारले,बाबूराव चांदेरे यांचा पलटवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/31cfceeb72b5fb4bac18b2d87ab6cc471737982285604718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Baburao Chandere Vastav 124 : बाबूराव चांदेरेंनी बिल्डरला का मारलं? पुणे कशामुळे बकाल होतंय ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/7a4d3c614e53118c191d5592915489f71737977469155718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Gulen bury syndrome Death in Maharashtra : पुण्यात काम करणाऱ्या सोलापुरच्या तरुणाचा गुलेन बरी सिंड्रोमने मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/e7fd283c9897c49cf2c65fa90c2ba3ed17378732439291000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)