Indrayani River Bridge Collapse : कुंडमळा पूल दुर्घटनेचा धडकी भरवणारा 'तो' फोटो समोर ABP MAJHA
मावळ : मावळ तालुक्यातील कुंडमळा (Kundmala bridge collapse) येथील इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल काल (रविवारी, 16 जून) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत पुलावर उभे असलेले अनेक पर्यटक नदीत कोसळून वाहून गेले. या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 52 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले. यामध्ये 51 जण जखमी झाले आहेत. या घटनेचा आता एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये तो पूल पडताना दिसत आहे, यावेळी त्या पूलावरती मोठ्या प्रमाणावर लोक असल्याचे दिसून येत आहे. अनेक लोक एकाच वेळी या पुलावरती आल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आत्तापर्यंत त्या पुलावर किती लोक होते त्याचा आकडा समोर आला नव्हता, मात्र, आताचा हा फोटो पाहून आपण अंदाज लावू शकतो, त्या ठिकाणी किती गर्दी होती.
महत्त्वाच्या बातम्या























