Diwali 2021 : Diwali Pahat : दिवाळीची सुरेल सुरुवात, पुण्यात दिवाळी पाहाटचं आयोजन ABP Majha
गेल्यावर्षीच्या दिवाळीवर कोरोनाचं सावट होतं... नैराश्याचं मळभ होतं.. निर्बंधाची चौकट होती.. त्यामुळं सण साजरा करण्याची कुणाचीच मानसिक स्थिती नव्हती... मात्र यंदाचं चित्र वेगळं आहे.. कोरोनामुळं आलेलं नैराश्य, दुःख, मळभ बाजूला सारुन पुन्हा एकदा नव्या उमेदिचा, आशा-आकांक्षाचा दिवा पेटवण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत.. सरकारनं देखील बऱ्याच प्रमाणात निर्बंध शिथिल केलेत. त्यामुळं यावर्षीच्या दिवाळीची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे.. पुणेकरांची आजची सकाळ सूरमयी ठरली... यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मंगेश पाडगावकर, शांता शेळके, अरुण दाते, श्रीनिवास खळे, यशवंत देव यांनी अजरामर केलेली गाणी यावेळी सादर करण्यात आली...























