Corona Update | ....तर पुण्यात कठोर निर्बंध; अजित पवारांकडून अल्टीमेटम
मागील काही दिवसांपासून पुण्यात सातत्यानं वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता आता कठोर पावलं उचलण्याचा इशारा खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तूर्तास पुण्यात कोरोनाचे रुग्ण पाहता रुग्णसंख्या वाढ ही प्रशासनापुढं उभी असणारी मोठी अडचण ठरत आहे. याच धर्तीवर सध्या लॉकडाऊन लागू केला नसला तरीही पुण्यात काही निर्बंध मात्र लागू करण्यात आले आहेत. ज्यामुळं काही सेवांवर याचा परिणाम होणार आहे. अजित पवार यांनी दिलेल्या माहतीनुसार 2 एप्रिलला पुण्यातील लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. इच्छा नसली तरीही येत्या पाच सहा दिवसात अशीच रुग्णवाढ होत राहिली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.























