Pune Navale Bridge Accident: नवले पुलावर भीषण अपघात, अपघाताप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून चौकशीची मागणी
काल रात्री पुण्यातील नवले पुलावर मोठा अपघात झाला, कंटेनरने धडक दिल्याने 48 गाड्या एकमेकांवर आदळल्या... या अपघातात ७ ते ८ जण जखमी झालेत तर वाहनांचंही मोठं नुकसान झालंय. रस्त्यांवर काचांचा खच पाहायला मिळतोय.. तसंच गाड्यांमधील इंधनसुद्दा रस्त्यावर सांडलं होतं..दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस कर्मचारी तसंच हेल्प रायडर्स संघटनेच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली... अपघातानंतर पुण्याच्या दिशेने जाणार्या मार्गावर वाहतूक कोंडीही झाली होती...सध्या कात्रज बोगद्याजवळून लहान गाड्यांची वाहतूक वळवण्यात आलीेय.. दरम्यान या अपघाताप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंनी चौकशीचे आदेश दिलेत...





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
