Chandrashekhar Bawankule : शरद पवारांचा बालेकिल्ल्यात बावनकुळेंचा दौरा, मिशन बारामतीला यश मिळणार?
मुंबईत शिवसेनेला लक्ष्य केलेल्या भाजपनं दुसरीकडे शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीकडेही मोर्चा वळवलाय. भाजपच्या मिशन बारामती मोहिमेची सुरुवात आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यानं होतेय. विशेष म्हणजे पवार कुटुंबीय निवडणूक प्रचाराची सुरुवात ज्या कनेरी गावातील हनुमान मंदिरातून करतात त्याच मंदिरातून बावनकुळे त्यांच्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. त्यानंतर काटेवाडीत कार्यकर्त्यांशी संवाद, रॅली, सभा, बैठका, गणेश दर्शन असा दिवसभराचा त्यांचा कार्यक्रम आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं विरोधकांकडे असलेल्या मतदारसंघांवर लक्ष्य केंद्रीत केलंय. त्यात पवारांचा बारामती बालेकिल्ला सर करण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे.
महत्त्वाच्या बातम्या





















