(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar - BJP Special Report : अजित पवार भाजप कार्यकर्त्यांना का नकोसे ?
Ajit Pawar - BJP Special Report : अजित पवार भाजप कार्यकर्त्यांना का नकोसे ? लोकसभेत महायुतीला म्हणावं तसं यश मिळालं नाही, तेव्हापासून या ना त्या कारणाने अजित पवारांच्या सरकारमधील सहभागाचा मुद्दा ऐरणीवर येतोय. आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्राने अजितदादांवर पराभवाचं खापर फोडलं... शिंदे गटाच्या रामदास कदमांनीही दादांवर तिरकस टिप्पणी केली... आणि आता तर भाजपच्या एका कार्यकर्त्याने एकवेळ सत्ता नसली तरी चालेल, पण अजितदादांना सत्तेतून हाकला, असा पवित्रा घेतलाय. पाहूयात... याबाबतचा सविस्तर रिपोर्ट... एकवेळ विधानसभेची सत्ता नसली तरी चालेल, पण अजितदादा नको अशी मागणी भाजप नेते सुभाष देशमुख आणि राहुल कुल यांच्यासमोर करण्यात आली. यासंदर्भात पुढचं पाऊल उचलण्यापूर्वी अजित पवारांनी देखील झाल्या प्रकाराची सविस्तर माहिती घेतली.. अजित पवार जरी या घटनेबाबत अद्याप शांत असले तरी त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत..