एक्स्प्लोर

High Court Exam Issue : उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेत गोंधळ, अभिजीत दिपकेंचा आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले...

High Court Exam : मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेत राज्यात विविध ठिकाणी गोंधळ झाल्याचं समोर येत आहे.

छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचं छत्रपती संभाजीनगर पाहायला मिळालं. याशिवाय कल्याण, वाशिम आणि भंडारा येथे देखील परीक्षेत तांत्रिक अडचणी दिसून आलं. या परीक्षेतील गोंधळामुळं विद्यार्थींनी कोर्टाच्या आवारात आंदोलन सुरु केलं.या विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) दाखल झाले. याशिवाय कल्याणमधील विद्यार्थ्यांसोबत अभिजीत दिपके यांनी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला.

अभिजीत दिपके काय म्हणाले?

मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेत राज्यभर गोंधळ झाला आहे. छत्रपती संभाजीनगरचं नाही तर नांदेड, कल्याण, ठाणे, नाशिक, गोंदियामध्ये ऑनलाइन परीक्षेत गोंधळ होत आहे, की बोर्ड काम करत नाही, सर्व्हर काम करत नाही. 10 मिनिटात लॉग आऊट होऊन जात आहे. म्हणजेच एका शिफ्टमध्ये असलेले विद्यार्थी फेल झाले. एवढा सगळा गोंधळ असताना ही परीक्षा कशी होऊ शकते, त्यामुळं ही परीक्षा पुन्हा घेतली गेली पाहिजे, असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं.  हा मुद्दा फक्त संभाजीनगरचा राहिलेला नाही, राज्याचा मुद्दा झाला आहे. जोपर्यंत फेरपरीक्षा घेण्याबाबत नोटिफिकेशन काढलं जात नाही आणि विद्यार्थ्यांना हार्डकॉपी मिळाली पाहिजे. परीक्षा देणारे विद्यार्थी बसून राहणार असतील तर मी देखील बसून राहणार असल्याचं अभिजीत दिपके यांनी म्हटलं. दिल्लीत 35 दिवस जंतरमंतरवर बसलो होतो, आता हेच आपलं जंतर मंतर असं दिपकेंनी म्हटलं. मुलांचा ऑनलाइन परीक्षेवर विश्वास नाही, ऑफलाइन परीक्षा झाली पाहिजे, असं अभिजीत दिपकेंनी म्हटलं.  

छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्ट लिपिक पदाच्या टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाला.सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगरमधील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होताच सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे शेकडो परीक्षार्थींची परीक्षा खोळंबली.लांबून आलेल्या परीक्षार्थींना अचानक आलेल्या या तांत्रिक अडचणीचा फटका बसल्यानं केंद्रावर संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. काही परीक्षार्थींनी गोंधळ घातल्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अधिकाऱ्यांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी परीक्षा पुन्हा घेतली जाणार की परीक्षार्थींना अतिरिक्त वेळ दिला जाणार? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तांत्रिक बिघाडाचा फटका परीक्षार्थींना बसला असून आता परीक्षा प्रशासन काय निर्णय घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कल्याण बाजार समितीमध्ये सुरु असलेल्या परीक्षेत गोंधळ झाला, यानंतर विद्यार्थ्यांनी अभिजीत दिपकेंना व्हिडिओ कॉल केला. 

नेमका वाद कशावरुन?

मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाची डिसेंबरला  2025 जाहिरात निघाली होती.महाराष्ट्रामध्ये 1380 जागा आहेत.26 एप्रिलला पूर्व परीक्षा झाली. एक महिन्यात मेन्स होती.ती साडेतीन महिन्याने झाली. आज हायकोर्ट लिपिक पदासाठी आज टंकलेखन परीक्षा होती. ही परीक्षा 20 मार्कांची असून वेळ 10 मिनिटं होती. यामध्ये उमेदवारांना लीगल पेसेज टाइप करायचा होता. परीक्षा सुरु असातना सॉफ्टवेअरमध्ये ग्लीचेस आले. कीबोर्ड लहान मोठे होते. कीपॅड वरील की दबत नव्हत्या. स्क्रीन दिसत नव्हती. सगळ्यांचा लॉगीन सेम टाईमला झालं नाही . त्यामुळे आपापसात गोंधळ झाला. एकूण शब्द आणि गाळलेले शब्द याची तुलना झाली नाही. अशा अनेक अडचणी विद्यार्थ्यांना आल्याची माहिती आहे.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

High Court Exam Issue : उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेत गोंधळ, अभिजीत दिपकेंचा आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले...
उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु, अभिजीत दिपकेंचा पाठिंबा, फेरपरीक्षेची मागणी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Sunil Kendrekar Majha Katta : माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget